गोंडवाना विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्यात सामंजस्स करार... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्यात सामंजस्स करार...

Vidrabha News India:-
VNI:-
गोंडवाना विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्यात सामंजस्स करार... 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यात नुकताच 'आदिवासी गौरव प्रवास आणि अनुभवातून नेतृत्व' या विषयावर  पूणे येथे सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि राज्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या 23 नवीन सामाजिक करार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यात गोंडवाना विद्यापीठाचा एक सामंजस्य करार आहे.
एका वर्षाला सहा कार्यशाळा आयोजित करण्यात येतील 20 शिक्षक आणि प्राचार्यांची बॅच असून सात दिवसांची कार्यशाळा राहील. आपल्याला कोणीही कितीही शिकवले तरी अनुभवातून घेतलेले शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते .ते कधीही आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. 
रुसा द्वारे स्थापित महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेद्वारे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांना 'आदिवासी गौरव प्रवास- अनुभवातून नेतृत्व 'या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षण 
दिले जाईल. सध्याच्या काळात कृतीतून जीवन शिक्षणाची गरज आहे. आपण बघतो की शिक्षण मुख्यतः वर्ग खोल्यांमध्ये होत असते. अनुभवात्मक नेतृत्व प्रशिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते.  गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात प्राध्यापक  मोठ्या सामाजिक प्रकल्पांचा अनुभव घेतील आणि त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेतील. अनुभवात्मक शिक्षण हे सर्व शिकण्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी असते. चंद्रपूर आणि गडचिरोली जो महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे. या जिल्ह्यात आरोग्य सेवा, शिक्षण, जंगल व्यवस्थापन इत्यादी विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. या भागात आदिवासींचे प्राबल्य आहे, आणि त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या कामाचा परिणाम थेट लाभार्थ्यांवर दिसून येतो. त्यामुळे राज्यभर पसरलेल्या विद्यापीठांच्या प्राध्यापकांना शिकण्याच्या भरपूर संधी आहेत.
म्हणून स्वयंसेवी संस्थांकडून सुरू असलेल्या या सर्व मौल्यवान प्रयत्नांबद्दल शैक्षणिक संस्था पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्राच्या इतर भागातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या परिसरात राहणार्‍या आदिवासी आणि ग्रामीण लोकांची स्थिती तसेच आदिवासी लोकांच्या जीवनावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचा प्रभाव याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या प्रशिक्षणातील शिक्षक प्राचार्य आपल्या भागामध्ये जाऊन येथील स्वयंसेवी संस्थांनी केलेले कार्य आपल्या भागात राबवतील. असे एकंदरीत या कार्यशाळेचे स्वरूप राहील.
याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ,की वेगवेगळ्या तज्ञ संस्थांना बरोबर घेऊन त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याचे हे सर्व समावेशक मॉडेल उचित आहे कारण कोणतीही एकच संस्था एवढ्या प्रकारचे शिक्षण देऊ शकत नाही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत जरी अवघड वाटली तरी ते टिकते आणि त्यात खरा आनंद असतो व्यक्ती निर्माणच्या या कामांमध्ये आपले सर्व प्रकारे देखरेख व सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले. 
'आदिवासी गौरव प्रवास आणि अनुभवातून  नेतृत्व' या विषयावर गोंडवाना विद्यापीठात  मागील सत्रात कार्यशाळा घेण्यात आली होती. या विषयी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे  यांनी आपले अनुभव सादर केले. याप्रसंगी विविध विद्यापीठाचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी ,तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ ,महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था चे कार्यकारी संचालक डॉ. विनायक निपुण, संबंधित शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->