बारावीच्या विद्यार्थ्यांचे आजपासून मिळणार प्रवेशपत्र; डाऊनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

बारावीच्या विद्यार्थ्यांचे आजपासून मिळणार प्रवेशपत्र; डाऊनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा..

दि. 10 जानेवारी 2025 
MEDIA VNI 
बारावीच्या विद्यार्थ्यांचे आजपासून मिळणार प्रवेशपत्र; डाऊनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा..
मीडिया वी.एन.आय : 
पुणे : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी - मार्चमध्ये होणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी – मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आज शुक्रवारपासून (दि.१०) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे. राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काही दिवस लवकर परीक्षा

प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य मंडळाच्या  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

प्रवेशपत्र गहाळ झाल्यास काय करणार?

प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रवेशपत्राची मुद्रित प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून विद्यार्थ्यांना मिळेल. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
Admit card of 12th students will be available from today; Click on the link to download.
#hsc #महाराष्ट्र #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->