पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या : गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची निवेदनातून मागणी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या : गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची निवेदनातून मागणी.!

दि. 09 जानेवारी 2025
MEDIA VNI 
पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या : गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची निवेदनातून मागणी.! 
- हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी.!
- जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले निवेदन.!
- गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली :  NDTV व बस्तर जंक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती, मुरूम माफीया, दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात. मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये. महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले. सदर मोर्च्यात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर, व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय टिपाले, राजेश खोब्रागडे, मनीष रक्षमवार, सुरेश पद्मशाली, मुकुंद जोशी, उदय धक्काते, हेमंत डोर्लीकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे 'जगदिश कन्नाके, मारोती भैसारे, विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कवरके, नाशिर जुम्मनशेख, हेमंत दुनेदार, महेश सचदेव, कैलास शर्मा, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नशिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके, निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे, जयंत निमगडे,  हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी,  उमेश गजलपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, नरेश सहारे, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके. गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, चोखोबा ढवळे, सतिस ढेभुर्णे, 'गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा आदि सहित जिल्हयातील दिडशे पत्रकार उपस्थित होते. 
Give death sentence to the killers of journalist Mukesh Chandrakar: Journalists of Gadchiroli district demand in a statement.
#गडचिरोली #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra 
#Chhattisgarh

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->