गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती.!

दि. 30 डिसेंबर 2025 
MEDIA VNI
गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली दि. ३०: राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे. 
सदर सूचनेनुसार गडचिरोली नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १अ , ४ब आणि ११ब तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०अ या चार ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून येथील निवडणूक सुधारित कार्यक्रम नुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले.
Elections for four municipal council members in Gadchiroli district postponed!
#MediaVNI #gadchiroli #Nagarparishd #election 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->