दि. 28 नोव्हेंबर 2025
गडचिरोलीत २९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा.! - भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या प्रचारार्थ सभा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या प्रचारार्थ दि.२९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.जाहीर सभा धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालया शेजारील (मार्लीवार) मैदानात दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे.
या सभेने भाजपाच्या स्थानिक उमेदवारांना नवसंजीवनी मिळणार असुन गडचिरोली चे वातावरण भाजपमय होण्याचे बोलले जात आहे. ही सभा भाजपाच्या उमेदवाराला नक्कीच विजयापर्यंत निवडून पोहचेल अशी आशा आहे. आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका, स्थानिक प्रश्न आणि विकासविषयक मुद्दे मांडले जाण्याची अपेक्षा आहे.
भाजपा च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर )
!!
या सभेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील व शहरातील समस्त नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
सभेबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत असून निवडणुकांच्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.