दि. 07 ऑगस्ट 2025
Gadchiroli Accident News: भीषण अपघात! रस्त्यावर व्यायाम करतांना भरधाव ट्रकनं ६ मुलांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे हा भीषण अपघात झाला आहे.
हे ६ मुलं रस्त्यावर व्यायाम करत होते त्यावेळी अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आला. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.