MEDIA VNI
Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; अहमदाबादमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ..
Gujrat Ahmedabad Plane Crash viral Video : मीडिया वी.एन.आय :
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. अहमदाबादहून निघालेले विमान काही सेकंदाच कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते, त्यामध्ये दोन पायलट, १० केबिन क्रू यांचा समावेश होता.
टेक ऑफ केल्यानंतर ७०० फुटांवरून विमान कोसळलं, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेकजणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतरचे भयावह फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जिकडे तिकडे धूर आणि कोळसा दिसत आहे.
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. ७०० फूटांवरून विमान कोसळल्यामुळे मोठी हाणी झाली आहे. विमानाचा सांगडा जळताना दिसत आहे. विमानातील सामान अन् इतर काही गोष्टींचा कोळसा झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडाला.
एअर इंडियाचे बी787 विमान VT-ANB, उड्डाण क्रमांक AI-171 साठी अहमदाबादवरून गॅटविकला उड्डाण केल्यानंतर लगेचच अपघातग्रस्त झाले. विमानात 242 प्रवासी होते, ज्यात 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू यांचा समावेश होता. विमानाची कमान कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याकडे होती आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते, अशी माहिती नागरी उड्डयन संचालनालय (DGCA) कडून देण्यात आली.
एअर इंडियाचे हे विमान उड्डाणानंतर 625 फूट उंचीवर पोहोचले असताना त्याचा एटीसीशी संपर्क तुटला. सिग्नल गमावल्यानंतर लगेचच विमानाचा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा विमानाचा वेग अंदाजे 174 नॉट होता. भारतीय हवाई दल आणि लष्कर बचाव कार्य करत आहेत. विमानतळाच्या बाहेरील भिंतीजवळ ढिगारा पडला आहे. डीजीसीएने अपघाताच्या चौकशीसाठी पथक पाठवले आहे. हा अपघात अहमदाबादच्या मेघाणी नगरजवळ घडला. अहमदाबाद विमानतळापासून मेघाणीनगरचे अंतर सुमारे 15 किमी आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओत प्रचंड धूर, विमानाचा सांगडा अन् जिकडे तिकडे स्मशान शांतता दिसत आहे.
Plane carrying 242 passengers crashes; Shocking video from Ahmedabad..
#MediaVNI #India
-અમદાવાદમાં પ્લેન ક્રેશ
— Gujarat First (@GujaratFirst) June 12, 2025
-ફાયક વીભાગે આપી પ્રાથમિક જાણકારી
-એરપોર્ટપર પ્લેન ક્રેસની ઘટના બની
-ફાયર વિભાગ ઘટનાસ્થળે જવા રવાના@ahmairport @airindia #Ahmedabad #PlaneCrash #BreakingNews #AirportEmergency #FireDepartment #AviationAlert #AirIndia #AhmedabadAirPort… pic.twitter.com/HZrhKwGBez