गडचिरोली : शिवणी येथील तरुणीवर अत्याचार करणा­रा आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली : शिवणी येथील तरुणीवर अत्याचार करणा­रा आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात.!

दि. 04 मार्च 2025 
MEDIA VNI 
गडचिरोली : शिवणी येथील तरुणीवर अत्याचार करणा­रा आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात.! 
- पोलिसांनी २४ तासात आरोपीला केले जेरबंद.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या शिवणी येथील २३ वर्षीय तरुणीवर दि. २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजताचे सुमारास गावाबाहेर शौचास गेली असताना, अज्ञात आरोपीकडून सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तरुणीला निर्दयीपणे मारहाण करुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. तरुणी बऱ्याचवेळा नंतरही घरी न आल्याने नातेवाईकांनी तरुणीचा शोध घेतला असता, ती गावाबाहेरील परिसरात बेशुद्ध स्थितीत आढळून आली होती.

तरुणीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. गडचिरोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दि.३ मार्च २०२५ रोजी तरुणीला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोस्टे गडचिरोलीची समांतर तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे मार्गदर्शनात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली विशाल नागरगोजे, स्था.गु.शा. गडचिरोलीच पो.नि. अरुण फेगडे, पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे, पोस्टे गडचिरोली व स्था.गु.शा.चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आश्वासन दिले आहे की, सदर प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशिल राहिल.

उपचारादरम्यान आज दि.४ मार्च रोजी दुपारी सदर तरुणी आपले बयाण देण्यासाठी सक्षम असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याकडून प्रमाणित करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलीसांकडून सदर तरुणीचे बयाण नोंदवून घेण्यात आले. पिडीत तरुणीच्या बयाणावरुन आरोपीविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे अप.क्र. १३१/२०२५ कलम ६४ (१), ६४ (२) (एल), ११५ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बयाणादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलीसांकडून तयार करुन घेण्यात आले होते. सदर रेखाचित्रावरुन पोलीसांनी गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळवत संशयित इसम नाव अनिल संतू उसेंडी, वय २३ वर्षे, रा. दोबे, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) हल्ली मुक्काम शिवणी ता. जि. गडचिरोली यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपीची कसून चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा केल्याचे पोलीसांसमक्ष कबूल केले आहे.

निलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली..
सदर प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशिल राहिल.

Gadchiroli: Accused of abusing a girl from Shivani in police custody within 24 hours! 
- The police arrested the accused within 24 hours.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->