सांसद चंद्रशेखर आजादवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आसपा कार्यकर्ते आक्रमक.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सांसद चंद्रशेखर आजादवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आसपा कार्यकर्ते आक्रमक.!

दि. 03 मार्च 2025
MEDIA VNI 
सांसद चंद्रशेखर आजादवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आसपा कार्यकर्ते आक्रमक.! 
- Z+ सुरक्षेची मागणी, अन्यथा देशभरात निषेध प्रदर्शन, राष्ट्रपतींना निवेदन.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली: उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती परिवारातील एका मुलीच्या लग्नात* दोन मुलींवर मारपीट झाली, डीजे बंद करण्यात आला, आणि लग्नाच्या वरातीवर हल्ला करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार देशात अश्पृश्यता व जातीय भेदभाव करणे निषिद्ध आहे.
या घटनेचा तीव्र विरोध करत, आजाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर जोरदार पथराव करण्यात आला, ज्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले.
भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावर पुन्हा पुन्हा होणाऱ्या धमक्यांवर आणि हल्ल्यांवर संपूर्ण भारतात आजाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या वतीने तीव्र निषेध दर्शविण्यात आला, तसेच उत्तर प्रदेश सरकारला बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली, आणि पीडित कुटुंबावर व भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेली, तसेच चंद्रशेखर यांच्यावर असे वारंवार झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी *सांसद चंद्रशेखर आजाद यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी* अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. 
निवेदन देताना आजाद समाज पार्टी प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा संघटक हंसराज उराडे, महीला सचिव शोभा खोब्रागडे, विधानसभा प्रभारी धनराज दामले, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार, नितीन भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ASP activists are aggressive against the attack on MP Chandrasekhar Azad. 
- Demand for Z+ security, otherwise nationwide protests, memorandum to President.!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->