गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकरिता समर्थ प्रणाली यावर प्रशिक्षण कार्यशाळा - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकरिता समर्थ प्रणाली यावर प्रशिक्षण कार्यशाळा

दि. २२ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकरिता समर्थ प्रणाली यावर प्रशिक्षण कार्यशाळा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी समर्थ प्रणाली प्रकल्प याविषयी दूरदृष्य प्रणाली द्वारे कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची उपस्थिती होती. अध्यक्ष स्थानावर बोलतांना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, ई समर्थ प्रणाली यामुळे कागदाचा अपव्य होणार नाही. कर्मचारी बाहेरगावी असतील तरीही या प्रणाली चा वापर करून रजा टाकू शकतील. यामुळे कर्मचाऱ्यांचाही वेळ वाचेल .सोमवार दि२३ जानेवारी पासून ही प्रणाली विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. या कार्यशाळेत सहाय्यक प्रबंधक ई समर्थ प्रणाली अलोक कुमार पटेल आणि सहाय्यक विवेक यादव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला विद्यापीठातील संविधानिक अधिकारी, अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीते करिता या प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ.प्रशांत सोनवणे आणि उपकुलसचिव आस्थापना कामाजी देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

समर्थ प्रणाली
हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रकल्प आहे. समर्थ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांसाठी मुक्त स्त्रोत, मुक्त मानक सक्षम मजबूत, सुरक्षित आणि प्रक्रिया सुलभीकरण यंत्रणा आहे. त्याची रचना आणि विकास इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेटिक्स अँड कम्युनिकेशन, दिल्ली विद्यापीठाने राष्ट्रीय मिशन इन एज्युकेशन  आयसीटी अंतर्गत केली आहे.
समर्थ प्रकल्प विद्यापीठात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला, युजर मॅनेजमेंट (यूएमएस) आणि एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टम (ईएमएस) लागू केले जातील आणि एकदा सर्व कर्मचारी लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार झाल्यानंतर आणि त्यांच्या डेटाची पडताळणी झाल्यानंतर या  मॉड्यूल व्दारे रजा घेता येणार आहे.
दिनांक २३ जानेवारीपासून या समर्थ प्रणाली द्वारे रजेचा अर्ज सादर करणे सुरू अनिवार्य राहील आणि ऑफलाइन पद्धतीने रजेचा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->