'या' दिवशी साजरी करण्यात आली होती पहिली 'बुद्ध पौर्णिमा' बघा इतिहास.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

'या' दिवशी साजरी करण्यात आली होती पहिली 'बुद्ध पौर्णिमा' बघा इतिहास..

दि. 23.05.2024

MEDIA VNI 

'या' दिवशी साजरी करण्यात आली होती पहिली 'बुद्ध पौर्णिमा' बघा इतिहास..Buddha Purnima : 

मीडिया वी.एन.आय : 

बुद्ध पौर्णिमा दिनविशेष : गौतम बुद्धांचा जन्म शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी हिंदू क्षत्रिय कुळात इ. स. 563 मध्ये लुंबिनी येथे झाला.

शाक्य गणराज्याचे राजकुमार असलेल्या गौतम बुद्धांचे नाव 'सिद्धार्थ' (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. इ.स.पू. 547 मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार गौतम बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' या नावांनी गौतम बुद्धांना ओळखले जाते.

बुद्ध जयंती हा बौद्ध धर्मीयांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमा जगभरात साजरी केली जाते. भारतात हा सण बौद्ध पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा हे सण साजरे केले जातात. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी प्रार्थना करण्यासाठी येत असतात. भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी सिद्धांतामुळे जगभरात त्यांचे अनुयायी होते. चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक बौद्ध पौर्णिमा हा सण उत्साहात साजरा करतात.

भारतात पहिली बुद्ध जयंती 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे साजरी करण्यात आली होती. 1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा केला गेला होता. 1951 ते 1956 दरम्यान साजरा करण्यात आलेल्या बुद्ध जयंतीला बाबासाहेब आंबेडकर स्वःत उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती 1956 साली दिल्लीत साजरी केली. सर्वात आधी दिल्लीत बुद्ध जयंती साजरी करण्याला सुरवात केल्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात बुद्ध जयंती 1953 साजरी करण्यास पासून सुरुवात केली. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत घेण्यात आले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती साजरी करण्यास बाबासाहेबानी सुरवात केली म्हणूनच त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते म्हटले जाते. 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.


🔷 गौतम बुद्धांची शिकवण (Gautam Buddha Thoughts)

1. अज्ञानी माणसाशी कधीही वाद घालू नये, अज्ञानी माणूस बैलासारखा असतो, तो ज्ञानाने नाही तर आकाराने मोठा दिसतो.

2. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

3. भूतकाळातील वाईट काळाची आठवण ठेवू नये, भविष्याची स्वप्नं पाहू नयेत, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावं.

4. संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहावं. कोणावरही विनाकारण संशय घेऊ नये.

5. कोणाचाही द्वेष आणि मत्सर बाळगून जीवनात आनंद मिळत नाही, मत्सर माणसाची मनःशांती नष्ट करतो.

6. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता, अथवा चिकटून राहता.

7. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा त्रास नक्की काय असतो याची पुरेपूर जाणीव असते.

8. जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्यही आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.

9. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.  

10. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो, त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल

11. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरूवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा.

12. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका, त्याचा अधिक त्रास होईल.

The first 'Buddha Purnima' was celebrated on this day. See history..Buddha Purnima:

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->