दि. 10 मार्च 2025
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रात यंदाच्या बजेटमध्ये खास काय ? गडचिरोली जिल्ह्याला स्टिल हब बनवणार ; अर्थमंत्री.!
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थ संकल्पातून अजित पवारांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीसाठी मोठी घोषणा केली.
हा जिल्हा स्टिल हब म्हणून उदयास आणणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. यासाठी 21 हजार 830 कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचं पवारांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे साडे सात हजार नवीन रोजगार निर्मिती होईल, असंही अजित पवारांनी भाषणात सांगितलं.
अजित पवार अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले, एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठ्या पावलं टाकत आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि गुंतवणूकदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे गडचिरोली 'स्टील हब' म्हणून उदयास येत आहे.
दावोस परिषदेत ऐतिहासिक गुंतवणुकीचा करार
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये (World Economic Forum) गडचिरोलीच्या विकासासाठी तब्बल 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या गुंतवणुकीतून जिल्ह्यातील खनिकर्म, स्टील उत्पादन आणि संबंधित क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर विकास केला जाणार आहे.
स्थानिकांना 7,500 नवीन रोजगारांची संधी
या प्रकल्पांतर्गत सुमारे 7,500 नवीन रोजगारनिर्मिती होईल, याचा मोठा फायदा स्थानिक युवकांना होणार आहे. या गुंतवणुकीमुळे गडचिरोलीमधील बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल, तसेच जिल्ह्यातील आर्थिक विकासाला वेग येईल. स्थानिक लोकसंख्येला उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे जिल्ह्याचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावेल.
खनिकर्म महामार्गांसाठी 500 कोटींची तरतूद
गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून खनिकर्म आणि स्टील उद्योगाचा विस्तार करण्यासाठी दळणवळणाच्या सोयी सुधारल्या जात आहेत. यासाठी विशेष खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांसाठी मोठी कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि उद्योग क्षेत्राचा विस्तार सुलभ होईल.
महत्त्वाचे मुद्दे:
गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक विकासाकडे वाटचाल.
दावोस परिषदेतील 21,830 कोटी रुपयांची गुंतवणूक.
7,500 नवीन रोजगारांची निर्मिती.
खनिकर्म महामार्गांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद.
गडचिरोली जिल्ह्याचा 'स्टील हब' म्हणून उदय.
गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक नकाशावर ठसा
गडचिरोली जिल्ह्यातील लोखंड आणि खनिज संपत्तीचा उपयोग करून स्टील उद्योग वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. या गुंतवणुकीमुळे गडचिरोली फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल.
राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि गुंतवणूकदारांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीसारखा आदिवासी बहुल जिल्हा आता वेगाने प्रगतीपथावर असून, लवकरच तो राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक जिल्ह्यांपैकी एक होणार आहे.
🔷 महाराष्ट्रात काय स्वस्त अन् काय महाग, यंदाच्या बजेटमध्ये काय खास?, वाचा सविस्तर..
Maharashtra Budget Session 2025 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget Session 2025) सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या.
काही नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांनुसार काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालं याची सविस्तर माहिती घेऊ या..
चारचाकी वाहनांचा टॅक्स अन् किंमतीही वाढणार
अजित पवार म्हणाले, 30 लाखांपेक्षा जास्त किंमती ज्या वाहनांच्या आहेत अशा वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या कराच्या कमाल मर्यादेत 20 लाखांहून 30 लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्य घेण्यात आला आहे. वाहन कराच्या मर्यादेत वाढ करण्याच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे जवळपास 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी शक्यता आहे.
हलक्या वाहनांच्या करात 7 टक्के वाढ
साडेसात हजार किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर 7 टक्के मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. या वाढीव कराच्या माध्यमातून 625 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळू शकतो असे अजित पवार म्हणाले.
मुद्रांक शुल्कात वाढीचा प्रस्ताव
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहारासाठी एका पेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केला तर पुस्तक दस्तऐवजांना 100 ऐवजी 500 रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. एखाद्या दस्तासाठी भरण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत सध्या 100 रुपयांच्या शुल्काऐवजी थेट एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा काय ?
महिला बचतगटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत मॉलचे बांधकाम होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद
चालू वर्षात आणखी 24 लाख महिलांना लखपती दिदी करणार.
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखणार.
आगामी दोन वर्षांत त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार
या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरर्षी 3 ऑक्टोबर या दिवशी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात येणार
अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 साठी राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, शहरी- 1 साठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना मोठा दिला मिळालेला आहे. येत्या पाच वर्षामध्ये राज्यातील वीजदर कमी होणार
महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर.
पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत.
नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार.
दुसऱ्या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे.
पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत ४० टक्क्यांची वाढ.
धनगर, गोवारी समाजासाठी २२ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.
औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
त्यानुसार 20 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगाराच्या निर्मितीचं लक्ष असणार आहे.
What is special in this year's budget in Maharashtra? Gadchiroli district will be made a steel hub; Finance Minister.!
#महाराष्ट्र #Maharashtra-Cabinet #MediaVNI