दुर्लभ क्षण! सावरला जंगल क्षेत्रात एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, पाहा Tiger व्हिडीओ... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

दुर्लभ क्षण! सावरला जंगल क्षेत्रात एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, पाहा Tiger व्हिडीओ...

Vidarbha News India:-

VNI:-

दुर्लभ क्षण! सावरला जंगल क्षेत्रात एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, पाहा Tiger VIDEO

विदर्भ न्यूज इंडिया

भंडारा : पवनी तालुक्यातील सावरला जंगल परिसरात मंगळवारी एकाच वेळी चार वाघांचे दर्शन गुराख्यांना झाले. चार वाघांचे दर्शन दुर्लभ मानले जाते आहे. मात्र व्याघ्र दर्शनाने परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पवनी तालुक्यातील सावरला हा भाग जंगलाने व्याप्त आहे. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा येथील जंगलाशी जोडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात वाघाचे दर्शन होत असते. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गुराखी गुरे चारत असताना त्यांना सावरला वनपरिक्षेत्राच्या तलाव क्र. २ जवळ एकाच वेळी चार वाघाचे दर्शन झाले.

विशेष म्हणजे वाघ वयस्क असून हे दृश्य दुर्लभ मानले जाते. विशेषत: वाघ एकटा राहणारा प्राणी आहे. कधी कधी जोडीने दिसून येतात. मात्र चार वयस्क वाघ एकत्र दिसून आले. या परिसरात लोकांना नेहमीच कामानिमित्त पवनी- ब्रह्मपुरी रस्त्याने ये-जा करावी लागते. त्यामुळे लोकांत मनात वाघांमुळे भीती निर्माण झालेली आहे. नागरिकांनी सायंकाळी ५ नंतर सावरला ते पवनी व सावरला ते ब्रह्मपुरी या रस्त्याने जाणे शक्यतो टाळावे, अशी माहिती सावरला बीटचे वनरक्षक महेश मंजलवर यांनी सांगितले.









Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->