पीएलजीए सप्ताह दरम्यान जिमलगट्टा उपविभागातील नागरिकांकडुन २० बंदुके पोलीसांच्या स्वाधिन - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पीएलजीए सप्ताह दरम्यान जिमलगट्टा उपविभागातील नागरिकांकडुन २० बंदुके पोलीसांच्या स्वाधिन


Vidarbha News India - VNI

पीएलजीए सप्ताह दरम्यान जिमलगट्टा उपविभागातील नागरिकांकडुन २० बंदुके पोलीसांच्या स्वाधिन

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ ला होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनूज तारे यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उप पो.स्टे. दामरंचा हद्दीतील नागरिकांनी २० भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केले आहेत. 
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात.

अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवून, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतुन नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वाधिन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उप पो.स्टे. दामरंचा हद्दीतील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या २० भरमार बंदुका ८ डिसेंबर २०२२ ला उप पो.स्टे. दामरंचा येथे पोलीस दलाच्या स्वाधिन केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पो.स्टे. दामरंचाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र कपले, उप पो.स्टे. उमेश कदम, पो.उप.नि. शिवराज लोखंडे, पो.उप.नि. सचिन घोडके तसेच उप.पो.स्टे. दामरंचा येथील पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->