रेल्वेच्या रखडलेल्या समस्या मार्गी; खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांना यश
मा.खा.अशोकजी नेते यांनी मा. अश्विनी जी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार यांना सुपरफास्ट, एक्सप्रेस ट्रेनच्या स्टॉपेजस (थांबा) बद्दल केलेल्या सततच्या मागणीला व पाठपुराव्याच्या प्रयत्नाला अखेर यश.
मागणीप्रमाणे वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेस (थांबा) होणार.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : खासदार अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित दिं.११-०८-२०२२ च्या दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे स्टॉपेजस (थांबा) वडसा जंक्शन स्टेशनवर वर गाडी संख्या 17007/08 सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस व नागभीड जंक्शन स्टेशनवर गाडी संख्या 12851/52 बिलासपूर चेन्नई एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनचे स्टॉपेजेस( थांबा ) केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विन जी वैष्णव यांनी मंजुर केलेला आहे.
मागील दोन वर्षे कोरोणाच्या काळात सुपरफास्ट ट्रेनच्या स्टॉपेजेस च्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे संबंधि समस्या प्रवासाच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे व पाठपुराव्याने सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) मार्गी लावण्यात यश आले आहे. यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांनी अखेर जनतेच्या हिताच काम यशस्वीरित्या पूर्ण झालं याच समाधान खासदार यांनी व्यक्त केल.