फेटाळलेल्या वनहक्क दाव्यांची समस्या मार्गी लागणार... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

फेटाळलेल्या वनहक्क दाव्यांची समस्या मार्गी लागणार...

दि. १६.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

फेटाळलेल्या वनहक्क दाव्यांची समस्या मार्गी लागणार...

विदर्भ न्यूज इंडिया

प्रतिनिधी/गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा forest rights शेती हा प्रमुख व्यवसाय असून शेतीशिवाय दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नाही. प्रशासनाने शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी वनजमिनीचे पट्टे दिले असले तरी हजारो दावे फेटाळून लावल्यात आले आहेत.

त्यामुळे गोरगरीब शेतकर्‍यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वनदावे मंजूर करतांना जाचक अटी न लादता वनदावे मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविद कात्रटवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली होती. या मागणीची दानवे यांनी दखल घेत फेटाळलेल्या वनदाव्यांची पुर्नतपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे forest rights गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी अरविंद कात्रटवार यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्यांसह अनेक समस्या लक्षात आणून दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील वनदाव्याची माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत 32 हजार 757 वनहक्काचे दावे मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच दस्तावेजाच्या पुर्तेतेअभावी 15 हजार 754 दावे फेटाळण्यात आल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. यावेळी फेटाळलेल्या दाव्यांची नव्याने पुर्नतपासणी करावी आणि दावे मंजूर करावेत, अशा सुचना दानवे यांनी जिल्हाधिकार्‍यां केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या धानाला बोनस, नियमीत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना सन्मान निधीचा मिळणारा लाभ, सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे यासह विविध समस्या मांडून शासनाला समस्या सोडविण्यासाठी भाग पाडण्याची विनंती केली. यावेळी उप तालुका प्रमुख यादव लोहंबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, नवनाथ ऊके यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->