जी-२० संमेलनात झळकणार 'गोंडवाना विद्यापीठ''एसटीआरसी' मार्फत बांबूवर आधारित वस्तूंचे प्रदर्शन - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

जी-२० संमेलनात झळकणार 'गोंडवाना विद्यापीठ''एसटीआरसी' मार्फत बांबूवर आधारित वस्तूंचे प्रदर्शन

दि. १६.०३.२०२३
                         MEDIA - VNI
जी-२० संमेलनात झळकणार 'गोंडवाना विद्यापीठ'
'एसटीआरसी' मार्फत बांबूवर आधारित वस्तूंचे प्रदर्शन
- पाच पेटेंटची नोंद...

(मीडिया - vni) : 
गडचिरोली : नागपूर येथे होऊ घातलेल्या जी-२० संमेलनात गोंडवाना विद्यापीठ झळकणार आहे. विद्यापीठाचा एक प्रकल्प असलेल्या 'सायन्स अॅण्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटर'(विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र )ची शिफारस गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केली असून त्यास संमेलनाची परवानगीही मिळाली आहे. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या चार अप्रतिम वस्तूंचे तसेच वैदूंच्या परंपरागत चिकित्सेविषयीचे सादरीकरण या संमेलनात करण्याची मानाची संधी गोंडवाना विद्यापीठाला मिळाली आहे.
या विद्यापीठाला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली आहे.  तसे पाहिले तर,गोंडवाना  विद्यापीठाचे हे वय फार मोठे नाही. मात्र, अल्पावधीच विद्यापीठाच्या 'एसटीआरसी' ने दुर्गम भागातील
आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले विविध प्रयोग कौतुकास्पद आहेत. तसेच  ५ पेटेंट नोंदविले आहेत. बांबूवर आधारित विविध जीवनोपयोगी आणि आकर्षक वस्तू तयार करण्यात 'एसटीआरसी'ने पुढाकार घेतला असून, त्यातील बांबूच्या 'युटीलिटी क्रॉफ्ट स्पेस' मधील वस्तू, बांबूपासून तयार केलेली शेतीची साधने, बांबूची आहेत.
अत्यंत कमी किंमतीची साधने आणि वैदूंच्या पारंपरिक औषधी ज्ञानाचा प्रचार करणारा उपक्रम या संमेलनात सादर केला जाणार आहे. हा उपक्रम अभिनव असल्याने त्या संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.संमेलनाच्या तयारीसाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन,  एसटीआरसीचे प्रमुख आशिष घराई, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार प्रयत्न करीत आहे.

'वैदूचिकित्सालय' एक अभिनव उपक्रम

गोंडवाना विद्यापीठाने 'एसटीआरसी'च्या माध्यमातून 'वैदू 'चिकित्सालय' असा एक अभिनव उपक्रम राबवला आहे. आदिवासी दुर्गम भागात
परंपरागत वन औषधींद्वारे प्रभावी उपचार केले असून अशा वैदूंची आणि त्यांच्या उपचाराविषयीची पुस्तिकाच विद्यापीठाने तयार केली आहे. शिवाय आठवड्यातून दोन दिवस विद्यापीठात वैदूंचे उपचाराचे केंद्र उघडले जाते आणि त्यास  चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे चिकित्सालय नागपुरातील जी- २० संमेलनात चर्चेचा विषय ठरेल.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->