आयुर्वेदीक औषधी संशोधनात गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय भरारी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आयुर्वेदीक औषधी संशोधनात गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय भरारी



दि.17.03.2023
Vision National International
आयुर्वेदीक औषधी संशोधनात गोंडवाना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय भरारी

MEDIA VNI : 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभिड येथील वनौषधी आधारीत नवसंशोधन केन्द्राने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेस विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन,व साहचर्य  विभागाचे संचालक प्रा. मनिष उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात संशोधन प्रकल्प सादर केला. विद्यापीठ परिक्षेत्रातील वनात आढळणा-या औषधी वनस्पती पासून स्थानिक वैदूंच्या पारंपारिक ज्ञानाच्या आधारावर संशोधन प्रक्रिया व्दारा १५ आयुर्वेदिक औषधी बनविण्याचा बाह्यस्त्रोत लाभकारी  असा हा संशोधन प्रकल्प आहे.
या अनुषंगाने 'आयुर्वेद उपचाराद्वारे कर्करोग रुग्णांचा केमोथेरेपी उपचारादरम्यान  होणारे दुष्परिणाम कमी करणे' या संदर्भात पाच संस्थाचा सहभाग असणारा तीस लक्ष्य रूपयांचा मोठा संशेधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मिळालेला आहे.
यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पूणे व देश भगत विद्यापीठ, मण्डी, पंजाब ह्या संस्था ज्ञानविषयक सहधर्मचारी असून कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार औषधी व पद्धती संदर्भात अनुसंधान प्रक्रीया संशोधन व विकास केंद्र, पॅकचोन्ग, थायलंड व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे व्दारे सामुहीक पध्दतीने होणार आहे. सदर प्रकल्पास पाचवी संस्था योग संस्कृतम विद्यापीठ, फ्लोरीडा, अमेरिका यांची आर्थिक सहाय्यता प्राप्त आहे.
सदर प्रकल्पामुळे राज्याचे नवनिर्मित गोंडवाना विद्यापीठास जनाधार उद्धीष्टपूती तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावर ओळख निर्माण करण्यास मोठा हातभार लागणार असा विश्वास डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू यांनी व्यक्त केला. सदर प्रकल्प डीसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावयाचा आहे. असे प्रा. मनिष उत्तरवार, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य यांनी कळविलेले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->