आपल्या क्षेत्रात अपक्ष आमदार निवडला, आता अपक्ष खासदार निवडणार.! बघा सविस्तर.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आपल्या क्षेत्रात अपक्ष आमदार निवडला, आता अपक्ष खासदार निवडणार.! बघा सविस्तर..

दि. 09.04.2024
MEDIA VNI
आपल्या क्षेत्रात अपक्ष आमदार निवडला, आता अपक्ष खासदार निवडणार.! बघा सविस्तर..
सुशिलकुमार पावरा यांना साक्री तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा.!
मीडिया वी.एन.आय : 
प्रतिनिधी/नंदूरबार - साक्री : बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे. सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. सुशिलकुमार पावरा हे चूलवड या गावाचे सुपूत्र आहेत. गांवकरी भाजप व काँग्रेस उमेदवारांना मतदान करणार नाहीत. आमचा सुशिलकुमार पावरा यांना पूर्ण पणे पाठिंबा आहे. आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.
सुशिलकुमार पावरा यांनी तालुका दौरा सुरू केला आहे. शहादा,शिरपूर,अक्राणी,अक्कलकुवा तालुक्यातील गावांचा जोरदार पाठिंबा मिळाल्यानंतर आता साक्री तालुक्यातील गावांचाही जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. साक्री शहर, शेवगा,खांडपाडा, सुकापूर, बोफखेल,छडवेल,इसर्डे, निजामपूर, अशा गांवाचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत साक्री तालुक्यातील जनतेने मंजूळा गावित यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले. आम्ही मतदार अपक्ष खासदारही निवडून आणण्याची क्षमता ठेवतो,असे म्हणत अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप गटात हडकंप माजला आहे. लढेंगे और जितेंगे, बिरसा फायटर्स जिंदाबाद अशा जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. भाजप उमेदवार हिना गावित व काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी या पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना गांवोच्या गावी पाठिंबा मिळत असल्यामुळे नंदूरबार लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारेल, असे स्थिती निर्माण झाली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->