पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.!

दि. 26 जुलै 2024 
MEDIA VNI 
पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : जिल्ह्यात या वर्षी पवसाळ्यात पुरपरिस्थीती उद्भवलेली आहे, या अनुषंगाने संभाव्य जलजन्य व किटकजण्य आजार टाळण्यासाठी   जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांनी पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे त्यासाठी जनजागृती तसेच विविध उपयोजना सर्व विभागाच्या समन्वयाने राबवल्या जात आहेत.
यामध्ये नागरिकांनी जलजन्य आजाराबाबत काळजी घ्यावी यामध्ये
• शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका.

• घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा.

• साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून गार करून प्या.

• लहान मुले आणि गरोदर माता यांना पिण्याचे पाणी उकळून गार केलेले द्या.

• पिण्याच्या पाण्याबाबत योग्य काळजी घ्या.

• आपल्या गावातील परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होते आहे ना याबाबत खातरजमा करा.

• ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा.

• घराबाहेर पडताना प्रवासात आपल्या सोबत पाणी ठेवा, जेणे करून कुठलेही पाणी पिण्याची वेळ येणार नाही.
तसेच किटकजन्य आजरबाबत
दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी मोकळी करा व आतून स्वच्छ घासून पुसून घ्या.

• रिकाम्या न करता येणाऱ्या भांड्यामध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्माचारी मार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाका.

• घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा.

• जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका.

• घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिज यांमध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ,तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर कार्यन्वीत आहे , जलजन्य व किटकजण्य साथ उद्भवल्यास तात्काळ नियंत्रण मिळवले जाणार आहे.तसेच हिवताप विभागामार्फत साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे , कंटेनर तपासणी नियमित ताप रुग्ण सर्व्हेक्षण चालू आहे तसेच आठवडी दर मंगळवार कोरडा दिवस व दर शनिवारी गप्पी मासे सोडण्याचा दिवस बाबत आदेश निर्गमित करण्यात आले  असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके यांनी सांगितले . जलजन्य आजाराबाबत  पाणी शुद्धीकरण, ब्लिचिंग पॉवडर तसेच मेडिक्लोर चा योग्य वापर करण्याच्या बाबत साथरोग अधिकारी डॉ रुपेश पेंदाम यांनी सूचना दिल्या आहेत.
Health department appeal to take care about water borne and insect borne diseases during monsoon. #गडचिरोली #gadchiroli #MaharashtraNews #health #maharashtra 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->