अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती.!

दि. 5 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती.!
MLA Prakash Solanke Political Retirement: 
मीडिया वी.एन.आय :  
मुबंई : शरद पवार गटापासून वेगळे झाल्यानंतर जनतेसमोर जाणे हे आधीच अजित पवार गटासाठी आव्हानात्मक होते. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट जोरदार तयारीला लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक घोषणादेखील केल्या आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

राजकीय निवृत्ती जाहीर

अजित पवार गटाच्या आमदाराने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नुकतीच आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी आपला राजकीय वारसदार कोण असणार, याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली आहे. 

'लाडकी बहीण'साठी योजनेसाठी पैसा कुठून आणणार? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

राजकीय वारसदाराची घोषणा

पुतण्या जयसिंह सोळंके हा आपला राजकीय वारसदार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या योजना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रचारासाठी अजित पवार आणि त्यांचे नेते ठिकठिकाणी दौरे करत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा पाहता प्रकाश सोळंके हेदेखील त्यांच्या मतदारसंघात जाऊन दौरे करत आहेत. मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांना सरकार कशाप्रकारे जनतेची कामे करत आहे याची माहिती पोहोचवत आहेत. दरम्यान एका गावात बोलतान, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याऐवजी जयसिंह सोळंके हे निवडणूक लढवतील, असे त्यांनी जाहीर केले. 

कोण आहेत जयसिंह सोळंके? 

जयसिंह सोळंके हे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या लहान बंधूंचे पुत्र आहेत. धैर्यशील सोळंके असे त्यांच्या लहान भावाचे नाव आहे. जयसिंह सोळंके हेदेखील राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी करत पक्ष नेतृत्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
Ajit Pawar's 'Ya' MLA retired from politics before the assembly elections.
#ajitpawar #MaharashtraNews 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->