शहीद 'महेश नागुलवार' यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

शहीद 'महेश नागुलवार' यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. 12 फेब्रुवारी 2025 
MEDIA VNI 
शहीद 'महेश नागुलवार' यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पोलीस-नक्षल चकमकीत पोलीस जवान शहीद.!
मीडिया वी.एन.आय :  
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी व फुलणार गावात दि.११ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान पोलीस जवान महेश कवडू नागुलवार, विशेष अभियान पथक सी-६० गडचिरोली, वय- ३९ वर्षे, रा- अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे जखमी झाले होते. त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पोलीस जवान महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.

दि.१२ फेब्रुवारी रोजी त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांचे मूळ गाव मौजा अनखोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.

२ मुलींचे पितृछत्र हरवले
शहिद पोलिस जवान महेश कवडू नागुलवार हे २०१२ ला पोलीस भरती सामील झाले होते.
त्यांना लग्नानंतर २ मुली आहेत.आज त्या दोन मुलीचे पितृछत्र हरवले आहे.

शहीद महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही," अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी-60 कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली.
भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलिस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. "महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत," असे त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) वरील संदेशात स्पष्ट केले आहे. 
Martyr Mahesh Nagulwar's sacrifice will not go in vain - Chief Minister Devendra Fadnavis
- Police jawan martyred in police-naxal encounter. #गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->