दि. 16 ऑगस्ट 2026
नवेगावं-मुरखळा ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : मुरखळा (नवेगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी मोटघरे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम सुरु करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच दशरथ चांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय समितीचे सदस्य रवींद्र खरात, उमाजी खेवले, प्रकाश मुद्दमवार, परमानंद पुनमवार, रंजीत सोलंकी, स्मिता रंगारी, पुष्पा उमरे, संगीता मांदाळे, रेखा लोणारकर, शीला कोकोडे, शुभांगी मोहुर्ले, निखिल सुंदरकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवेगाव व मुरखळा येथील विद्यार्थी व शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय, मुखरका येथील विद्यार्थी व शिक्षक, तसेच अंगणवाडीतील विद्यार्थी व सेविका उपस्थित होत्या. याशिवाय गावातील विविध महिला बचत गटातील महिला आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहण्यात आली. ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मुरखळा येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.