महाराष्ट्रात भेसळखोरांवर FDAचा घणाघात; तब्बल 55 कोटींचा साठा जप्त.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

महाराष्ट्रात भेसळखोरांवर FDAचा घणाघात; तब्बल 55 कोटींचा साठा जप्त.!

दि. 05 ऑगस्ट 2026 
MEDIA VNI 
महाराष्ट्रात भेसळखोरांवर FDAचा घणाघात!
तब्बल 55 कोटींचा साठा जप्त; ॲनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी.! 
मीडिया वी.एन.आय : 
मुंबई : महाराष्ट्रात नागरिकांच्या ताटात पोहोचणाऱ्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेत आता तथाकथित ॲनालॉग अर्थात नॉन-डेअरी पनीर थेट रडारवर आले आहे.
राज्यात ॲनालॉग पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 30 जुलै रोजी जारी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

🔴 308 ठिकाणांहून पनीरचे नमुने

FDAने विविध ठिकाणांहून पनीरचे 308 नमुने तपासणीसाठी घेतले. यापैकी सुमारे 35 टक्के नमुने धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात गोदामे, उत्पादक, वितरक, विक्रेते तसेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी आणखी तीव्र केली जाणार आहे.

हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही दुधापासून तयार केलेले पनीर वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंदी असलेले ॲनालॉग पनीर वापरताना किंवा विकताना कोणी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

🔥 3,136 आस्थापनांची तपासणी

25 मे ते 31 जुलै या कालावधीत FDAने राज्यभर मोठी मोहीम राबवली. या काळात 3,136 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तर 774 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या.

या व्यापक कारवाईत 165 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सुमारे 28 लाख 66 हजार 96 किलो मालाचा साठा जप्त/नष्ट करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील जवळपास 890 फूड आउटलेट्सचीही तपासणी करण्यात आली आहे.

⚠️ ॲनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय?

पारंपरिक पनीर हे दुधापासून तयार केले जाते. मात्र ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरमध्ये दुग्धजन्य घटकांऐवजी इतर घटकांचा वापर केला जातो. FDAच्या माहितीनुसार अशा उत्पादनांमध्ये प्रथिनांच्या तुलनेत वनस्पतीजन्य चरबीचा वापर आढळल्याने त्याच्या विक्रीवर कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

उत्पादकांपासून वाहतूकदार, वितरक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना बंदीचे आदेश लागू असणार आहेत.

🚨 भेसळखोरांना स्पष्ट इशारा!

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात FDAची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गोदामांपासून हॉटेलपर्यंत तपासणी केली जाणार असल्याने बनावट आणि भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे.

सवाल एवढाच — आपण बाजारातून किंवा हॉटेलमधून खात असलेले पनीर खरंच दुधापासून बनलेलं आहे का?

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->