गडचिरोली हादरलं! सिरोंचात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्लीपर्यंत जाणवले धक्के.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली हादरलं! सिरोंचात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्लीपर्यंत जाणवले धक्के.!

दि. 03 सप्टेंबर 2026 
MEDIA VNI 
गडचिरोली हादरलं! सिरोंचात ३.६ तीव्रतेचा भूकंप; अहेरी-नागेपल्लीपर्यंत जाणवले धक्के.! 
- पहाटेच्या सुमारास भूकंपाने नागरिकांमध्ये खळबळ; सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी नाही.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी नागरिकांना हादरवून सोडले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली असून, या भूकंपाचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. सिरोंचा परिसरासह अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही सौम्य धक्के जाणवल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, दिलासादायक बाब म्हणजे प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासनाने तातडीने परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, सर्व संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये, अफवा आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. आवश्यक ती दक्षता बाळगावी. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अफवांपासून सावध रहा; प्रशासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या!
भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचात, धक्के अहेरी-नागेपल्लीपर्यंत; सुदैवाने मोठी हानी टळली!
Gadchiroli shaken! 3.6 magnitude earthquake in Sironcha; tremors felt as far as Aheri-Nagepalli.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->