दि. 27 ऑगस्ट 2026
अहेरी केंद्रांतर्गत शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर मंथन.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/अहेरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात अहेरी तालुक्यातील समूह साधन केंद्र अहेरी अंतर्गत आयोजित भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकासावर मंथन करण्यात आले.
शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान अहेरी केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास कोंडागोर्ला यांनी भूषविले तर उदघाटक म्हणून भगवंतराव शाळेचे प्राचार्य शाहीद शेख व प्रमुख पाहुणे म्हणून विशेष शिक्षक जितेंद्र राहूड, मुख्याध्यापक सुधाकर घोसरे, साधनव्यक्ती ताराचंद भुरसे उपस्थित होते.
यावेळी शिक्षण परिषदेत पूर्वचाचणी नंतर निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व कृतिकार्यक्रम अंमलबजावणी यावर पदमा गोडसेलवार व अध्ययन निष्पत्तीवर आधारित नमुना पाठाचे सादरीकरण गंगू सिडाम यांनी केले. मॉडेल स्कूल अहेरीने विविध क्षेत्रात केलेली प्रगती, शिष्यवृत्ती व एनएमएमएस सारख्या परीक्षेतील यश यावर आधारित शाळेची यशोगाथा योगिता नैताम यांनी तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कृती कार्यक्रम, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा पूर्वतयारी व मूल्यवर्धन उपक्रम याबाबत केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास कोंडागोर्ला यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या विविध सत्रात डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी अंतर्गत खान अकॅडमी शिक्षक व विद्यार्थी नोंदणी याबाबत प्रदीप रामगिरवार, दिक्षा कोर्सेस बाबत सुनिल मामीडवार, नवभारत साक्षरता याबाब सुधाकर घोसरे व आनापान साधना मित्रा उपक्रम प्रात्यक्षिक याबाबत ताराचंद भुरसे यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेला केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व इयत्ता 1 ते 8 ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राजक्ता पेद्दापल्लीवार यांनी तर आभार सुनील मामीडवार यांनी मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरीचे प्राचार्य, सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.