ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; भाजपाच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश ;- आ. डॉ. देवराव होळी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; भाजपाच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश ;- आ. डॉ. देवराव होळी

Vidarbha News India:-
VNI:-
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा;
भाजपाच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश ;- आ. डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी:-
राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून भारतीय जनता पार्टीने या संदर्भात सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍याचे हे यश असल्‍याचे मत आज आ. डॉ देवराव होळी यांनी व्‍यक्‍त केले आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्‍याचा प्रश्‍न दिर्घकाळ प्रलंबित होता.  हा प्रश्न निकाली निघावा म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने प्रयत्न केले . श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. राज्यात ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या, २४१ नगरपालिका, २७ महापालिका, १२८ नगरपंचायती आणि २७८३१ ग्रामपंचायती आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बाठिंया आयोगानुसार २६ टक्के आरक्षणाप्रमाणे ७ महापालिकांचे महापौर पद ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधीला मिळेल. राज्यातील २४१नगरपालिकांपैकी २७ टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे ६६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होईल. १२८ नगरपंचायतीपैकी ३७ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असेल. नगरपंचायतीमध्ये देखील ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल.ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीने ओबीसी बांधवांना दिलेला शब्‍द पाळला असल्‍याची प्रतिक्रिया आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी व्‍यक्‍त केली आहे.
या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी तालुका चामोर्शी चे वतीने आज चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट चौक येथे आज सकाळी 10,30 वाजता राज्य सरकारचे धन्यवाद व आभार करण्यासाठी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे मार्गदर्शनात ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जनता पार्टी ओबीसी आघाडी तालुका चामोर्शी चे वतीने करण्यात आले यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे , भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा , युवा नेते निरज रामानुजवार ,प्रतीक राठी ,भोजराज भगत , मास्टर रामचंद्र वरवाडे , प्रशांत पालारपवार , ज्येष्ठ नेते जयराम चलाख , नरेश अल्सावार , रेवणाथ कुसराम व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->