आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील प्रमुख मार्गासाठी खेचून आणला २० कोटी रुपयांचा निधी - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील प्रमुख मार्गासाठी खेचून आणला २० कोटी रुपयांचा निधी

Vidarbha News India:-
VNI:-
आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील प्रमुख मार्गासाठी खेचून आणला २० कोटी रुपयांचा निधी  
विदर्भ न्यूज इंडिया 
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांची दुरदर्शा झाली आहे. त्यामुळे हे मार्ग तयार करण्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. दरम्याण त्यांच्या मागणीला यश आले असुन चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे लवकरच या कामांना आता सुरवात होणार आहे. चंद्रपूर शहराच्या सर्वसमावेश विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. कोरोणाच्या काळात अनेक विकास कामे प्रभावित झाली होती असे असतांनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचुन आणला.
परिणामी शहरी भागासह ग्रामिण भागातील विकास कामांना गती मिळाली आहे. दरम्याण चंद्रपूर शहरातील समस्यांसदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी ७ जुलै २०२२ ला मनपातील अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरातील मुख्य मार्गाच्या बांधकामाची गरज मनपा प्रशासकांनी बोलुन दाखवली या कामासाठी मोठ्या निधीची गरज होती. त्यामुळे सदर महत्वाच्या विकास कामांसाठी २० कोटी रुपये देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. सदर मागणीचा पाठपुरावा त्यांच्या वतीने सुरु होता. अखेर त्यांच्या या मागणीची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. चंद्रपूर शहरातील प्रमुख ५ मार्गांसाठी त्यांनी २० कोटी रुपये मंजुर केले आहे. या निधीतून जटपूरा गेट ते गिरणार चौक आणि गांधी चौक ते जटपूरा गेट या मार्गावर ९  कोटी रुपये खर्च करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यापासून बिनबा गेट या मार्गासाठी ३ कोटी रुपये, गांधी चौक ते पठाणपूरा या मार्गासाठी ३ कोटी रुपये, मिलन चौक ते सराफा बाजार पर्यंतच्या मार्गासाठी २ कोटी ५० लक्ष, गिरणार चौक ते समाधी वार्ड पर्यंतच्या मार्गासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. सदर निधी मंजुर करण्यात आल्यामुळे या कामांना आता लवकरच सुरवात होणार आहे. मागणीची दखल घेत तात्काळ निधी मंजुर करुन दिल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. मतदार संघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असुन निधीचा योग्य वापर करण्यावर आपला भर आहे. अनेक विकास कामे शहरात सुरु असुन अनेक कामे प्रस्तावित आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा एकत्रीतरित्या विकास करणे हा आमचा ध्येय असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->