दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीने केवळ ११ तासात १७ कि. मी. गडाची चढाई केली पूर्ण : इंडिया बुक्स ऑफ रेकार्डमध्ये नोंद - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीने केवळ ११ तासात १७ कि. मी. गडाची चढाई केली पूर्ण : इंडिया बुक्स ऑफ रेकार्डमध्ये नोंद


Vidarbha News India:-
VNI:- 
केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीने केवळ ११ तासात १७ कि. मी. गडाची चढाई केली पूर्ण : इंडिया बुक्स ऑफ रेकार्डमध्ये नोंद
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : महाराष्ट्रातील भीमाशंकर गडाचे नाव घेता भल्या-भल्या ट्रेकर्सना घाम फुटतो. परंतु, डहाणूतील वडकून येथल्या केशवी राम माच्छी या दोन वर्षे दहा महिन्याच्या चिमुकलीनने केवळ 11 तासांत 17 कि.मी. गडाची चढाई पूर्ण केली. डहाणूतील गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपने 31 जुलै रोजी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. याकरिता 30 जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने प्रवास सुरू केला. या ग्रुपसोबत वडकून खेतीपाडा येथील आनंद माच्छी, पत्नी आणि बहीण हे निघाले. मात्र, आपण सोबत येणार, असा हट्ट अवघ्या दोन वर्षांच्या केशवीने धरला होता.
खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केशवी काही ऐकेना म्हणून आनंद माच्छी यांनी तिलाही सोबत घेतलं. तिच्या एवढ्या लहान वयाचा विचार करता ती भीमाशंकर गडाची चढाई करेल का? असा प्रश्न गडप्रेमी ग्रुप आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात होताच. तिच्या चढाईबाबत सर्वांना शंका होती. सकाळी साडेदहा वाजता केशवीने खांडस गावातून भीमाशंकरच्या चढाईला सुरुवात केली. गडप्रेमी ट्रेकर्स ग्रुपसोबत केशवीही चालत निघाली. या गडावर चढाईसाठी पायऱ्या नसल्याने काका, काकूचा तर कधी आत्या आणि बहिणीचा हात धरून ती चालू लागली. या प्रवासात केशवीला तिच्या कुटुंबीयांनी तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर गडावरील, हिरवी झाडे, छोटे धबधबे, पक्षी, माकड, पाहून जणू भूरळ पडल्याप्रमाणे ती शिखराकडे मार्गक्रमन करत होती. छोट्या चिमुरडीचा मोठा पराक्रम, धाडस आणि उत्साह पाहून सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु होता.
श्रावणमास सुरू असल्याने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांची खूपच गर्दी होती. छोट्या केशवीचे धाडस आणि उत्साहपाहून त्यांच्याकडून कौतुक सुरू होते. त्यामुळे तिचा उत्साह वाढल्याने कोणीही कुरबूर अथवा मदत न घेता गणेश घाटाच्या मार्गाने बारा वाजल्याच्या सुमारास केशवीनं 8.70 किमी चढाई पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा दीड वाजता परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही ती स्वतः हून पुढे आली. तिचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गडाचा पायथा गाठताना ती थकली. मात्र, गडप्रेमी ग्रुपने तिला प्रोत्साहित केल्याने साडेसहाच्या सुमारास तिनं एकटीने यशस्वीरीत्या भीमाशंकर गडाचं ट्रेकिंग पूर्ण केले. केशवीला गडावर चढाई करण्यासाठी सहा तास तर परत येण्यासाठी 5 तास तीस मिनिटे लागली. तब्बल 17 कि. मीचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी केशवीला अकरा तास तीस मिनिटांचा कालावधी लागला आहे. छोट्या चिमुरडीचा मोठा पराक्रमछोट्या चिमुरडीचा मोठा पराक्रमतिची पहिली ट्रेक
या ट्रेक स्पर्धेत 62 लोक सहभागी झाले होते. केशवी राम माच्छी ही सर्वात लहान वयाची स्पर्धक होती. तिचे अवघे वय दोन वर्षे दहा महिन्याचे आहे. तीन वर्षसुद्धा पूर्ण झालेली नाहीत. एवढ्या लहान वयात तिनं भीमाशंकर गडाची चढाई कुणाच्या मदतीविना पूर्ण केली. तिचीही पहिली ट्रेक होती. केशवीला ट्रेकचे धडे तिचे चुलते आनंद माच्छी यांच्याकडून मिळाले. केशवीच्या कामगिरीचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आतापर्यंत 65 ठिकाणी ट्रेकचे आयोजन कोणतेही प्रशिक्षण, सराव इत्यादीचा अभाव असताना तिने काकांसोबत ट्रेकिंगला जाण्याच्या जिद्दीपोटी भीमाशंकर गडाची यशस्वीरित्या चढाई केली आहे. या ट्रेकचे आयोजन गडप्रेमी टेकर्स डहाणू ग्रुपचे अध्यक्ष अमुल तांडेल यांनी केले होते. सन 2018 पासून ते ट्रेकचे आयोजन करतात. त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत 65 ठिकाणी अशा ट्रेकचे आयोजन केले होते. या ट्रेकच्या उद्देशाबद्दल त्यांना विचारणा केली असता, प्रत्येक गडाचा इतिहास काय? याची माहिती घेणे. तसेच गडावर स्वच्छता करणे, वृक्ष लागवड करणे, गडावरील कचरा गोळा करून जाळणे, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही ट्रेकच्या माध्यमातून राबवतो, असे अमूल तांडेल यांनी ट्रेकबद्दल यावेळी सांगितले. केशवीच्या याच धाडसाची नोंद आता इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->