धक्कादायक ! ट्रॅक्टर अडवल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; अंगावर घातली गाडी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

धक्कादायक ! ट्रॅक्टर अडवल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; अंगावर घातली गाडी

Vidarbha News India:-
VNI:-
धक्कादायक ! ट्रॅक्टर अडवल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; अंगावर घातली गाडी
- ट्रक अडवल्याने एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
विदर्भ न्यूज इंडिया
गोंदिया : गोंदियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रक अडवल्याने एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात वनपरिक्षेत्र अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा इथल्या विनोद फर्निचर मार्टसमोरील रोडवर सागवान लाकडाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. या ट्रॅक्टरला नंबरही नव्हता. त्यामुळे गस्तीवर असलेल्या विभागीय व्यवस्थापक नितीशकुमार आणि वनपरिक्षेत्राधिकारी मंगेश बागडे यांनी ट्रॅक्टर अडवला. ट्रॅक्टर चालकाकडे त्यांनी वाहतूक परवाना मागितला.
ट्रॅक्ट चालकाने यासंदर्भात फोन करुन आपल्या मालकाला बोलावून घेतलं. आपली गाडी अडवल्याचा राग मनात ठेऊन दुचाकीवरुन आलेल्या मालकाने दुचाकी थेट वनपरिक्षेत्राधिकारी बागडे यांच्या अंगावर घातली आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 
या हल्ल्यात बागडे गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सागवानने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला असून फर्निचर दुकानाचा मालक विनोद जैन याच्यासह दिनेश कटरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->