Whatsapp वर 'App Language' चा पर्याय, आता आपल्या भाषेत वापरा अ‍ॅप... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Whatsapp वर 'App Language' चा पर्याय, आता आपल्या भाषेत वापरा अ‍ॅप...

Vidarbha News India :-
VNI:-
Whatsapp वर 'App Language' चा पर्याय, आता आपल्या भाषेत वापरा अ‍ॅप
- आतापर्यंत तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट, चॅट्स, नोटिफिकेशन्स, स्टोरेज आणि डेटा आणि हेल्पचा पर्याय आहे. आता 'App Language' हा एक नवीन पर्याय असणार आहे.
विदर्भ न्यूज इंडिया
सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधणं सर्वात सोपं आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपही युजर्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप टप्प्याटप्प्याने त्यात नव नवे अपडेट करत असतं. नवं फीचर्स टेस्टिंग केल्यानंतर सर्वांसाठी रोलआउट केलं जातं. असंच एका नव्या फीचर्सची माहिती समोर आली आहे. या फीचर्सचं नाव 'App Language' असं आहे. या फीचर्सच्या माध्यमातून युजर्स आपली भाषा निवडू शकतात. आतापर्यंत तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट, चॅट्स, नोटिफिकेशन्स, स्टोरेज आणि डेटा आणि हेल्पचा पर्याय आहे. आता 'App Language' हा एक नवीन पर्याय असणार आहे.
Wabetainfo च्या ताज्या रिपोर्टमध्ये 'App Language' बद्दल माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, Android 2.22.19.10 अपडेटसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये बीटा टेस्टर्ससाठी 'App Language' साठी सपोर्ट जोडण्यात आला आहे. या फीचरद्वारे युजर्स त्यांच्या पसंतीच्या भाषेत व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतील. आत्तापर्यंत, हे वैशिष्ट्य फक्त काही बीटा युजर्ससाठी होते. आगामी काळात सर्व वापरकर्त्यांसाठी सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये जाऊन एक नवीन पर्याय मिळेल, ज्याचे नाव 'App Language' असेल. या विभागात जाऊन युजर्स त्यांच्या अ‍ॅपची भाषा बदलू शकतात. जेव्हा जेव्हा युजर्स व्हॉट्सअ‍ॅप रि-इन्स्टॉल करतात तेव्हा त्यांना भाषा बदलण्याचा पर्याय दिसेल.
मागील काही रिपोर्ट पाहता, व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच 'अवता'र फीचर उपलब्ध असेल. या फीचर अंतर्गत, युजर्स त्यांचा अवतार तयार करू शकतील. 'अवतार' स्टिकर्स मित्रांसोबत प्रोफाइल फोटोवर ठेवता येईल.
व्हॉट्सअ‍ॅप अवतार फीचरसोबतच इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर अनेक नवीन फीचर्स सादर केले जाऊ शकतात. यामध्ये ग्रुप पोल फीचरचा समावेश असेल. ज्यामध्ये युजर्स ग्रुपमध्ये प्रश्न विचारून कोणत्याही प्रश्नासाठी पोल तयार करू शकतील. मतदानाव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मवर ट्विटरसारखे 'एडिट' वैशिष्ट्य देखील असणार आहे.  लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर टायपो-एररसह पाठवलेला संदेश एडीट करण्याची सुविधा मिळणार आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->