पॅन कार्ड मधील या चुकीसाठी भरावा लागेल 10 हजारांचा दंड, IT डिपार्टमेंटचा नियम जाणून घ्या... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पॅन कार्ड मधील या चुकीसाठी भरावा लागेल 10 हजारांचा दंड, IT डिपार्टमेंटचा नियम जाणून घ्या...

Vidarbha News India:-
VNI:-
पॅन कार्ड मधील या चुकीसाठी भरावा लागेल 10 हजारांचा दंड, IT डिपार्टमेंटचा नियम जाणून घ्या
- पॅन कार्ड हे भारतातील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अतिशय उपयुक्त आहे. 
विदर्भ न्यूज इंडिया
पॅन कार्ड हे भारतातील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अतिशय उपयुक्त आहे. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं आहे. बँक व्यवहारांवर किंवा एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी पॅन कार्ड देणं आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा दहा अंकी अल्फान्यूमेरिक नंबर आहे. हा नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. पॅनकार्ड हा संपूर्ण भारतातील सर्व करदात्यांना दिलेला ओळख क्रमांक आहे. पॅन कार्डवर पॅन क्रमांक आणि कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख आणि छायाचित्र असते. जर एखाद्या व्यक्तीला पॅन वाटप केले असेल तर तो दुसऱ्या पॅनसाठी अर्ज करू शकत नाही.
भारतातील कोणत्याही व्यक्तीला फक्त एकच पॅन कार्ड दिलं जातं. कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवू शकत नाही. तसे केल्यास त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो.  आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन ठेवल्याबद्दल त्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
आयकर विभागाचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन वाटप केले गेले असेल तर त्याने त्वरित अतिरिक्त पॅनकार्ड सरेंडर करावे. अशा प्रकारे, कोणत्याही प्रकारचा दंड देखील टाळता येऊ शकतो.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->