एक जहाल महिला नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

एक जहाल महिला नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

Vidarbha News India:-
VNI:-
एक जहाल महिला नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश  
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली :
 उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने 28/09/2022 रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना  28/09/2022 रोजीचे सायं. 7:00 ते 8:00 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 30 ते 40 नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. 
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर 01 नक्षल मृतदेह मिळुन आले. तसेच मृतदेहासोबत 8 एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.
माहे आक्टोबर 2020 रोजी पासून ते आतापर्यंत एकुण 55 नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून, 46 नक्षलवादी अटक व 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 
सदर अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->