राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसा संदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लीक वर... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसा संदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लीक वर...

Vidarbha News India:-
VNI:-
राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसा संदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लीक वर...
Maharashtra Rain Live Updates : 
विदर्भ न्यूज इंडिया
राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, गणपतीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बुधुवारी सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->