वाघाने घेतला गुराख्याचा बळी; गावापासून १ मी दुर अंतरावरची घटना - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

वाघाने घेतला गुराख्याचा बळी; गावापासून १ मी दुर अंतरावरची घटना

Vidarbha News India:-
VNI:-
वाघाने घेतला गुराख्याचा बळी; गावापासून १ मी दुर अंतरावरची घटना 
विदर्भ न्यूज इंडिया
डचिरोली
: गावापासून अगदी एक किमी अंतरावरच्या जंगलात स्वतःची गुरे चारत असताना वाघाने हल्ला केल्याने एक शेतकरी गुराखी ठार झाला.

ही घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा महागू ढोणे (५९) रा. कळमटोला असे मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कळमटोला येथील कृष्णा ढोणे हे नेहमीप्रमाणे आपले बैल इतर चार सहकाऱ्यांसमवेत गावापासून जवळच एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये सकाळी १०:३० वाजता घेऊन गेले.

सर्वजण जवळपास राहून आपापली गुरे चारत होते. दरम्यान दुपारी २ वाजता वाघाने एका भाकडी (वासरू) वर हल्ला केला तेव्हा सर्व गुराख्यांनी जनावरे एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तरीही वाघाने भाकडीला ठार केले. त्यानंतर वाघाने गुराखी कृष्णा ढोणे यांच्यावर हल्ला करीत फरफटत नेले. याही वेळी इतर गुराख्यांनी आरडाओरड केली. परंतु वाघाच्या रौद्र रुपापुढे कुणाचेच काही चालले नाही. अखेर गावातील काही लोकांना बोलावून शोधमोहीम राबविली असता घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर कृष्णा ढोणे यांचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना देताच त्यांनी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली येथे पाठविला.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->