Vidarbha News India - VNI
Ankit Goyal : आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक म्हणून 'या' जिल्ह्याचा पदभार
- आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार (IPS officer Ankit Goyal) स्वीकारला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून त्यांनी सुत्रे हाती (taken charge as Superintendent of Police) घेतली.
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून त्यांनी सुत्रे हाती घेतली.
कामगिरीचे शासनाकडून कौतूक : अंकित गोयल यांची राज्य शासनाने पुणे जिल्ह्याच्या अधिक्षकपदी नियुक्ती केली होती. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या काळात अनेक नक्षलवादी शरण आले होते. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केले होते. त्यांच्या या कामगिरीचे शासनाकडून कौतूक करण्यात आले होते. नक्षलवादी भागात केलेल्या कार्यामुळे गडचिरोली पोलीस दलात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना शासनाची विवीध पदाने गौरविण्यात आले आहे. यामध्ये गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोयल यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
डॉ. देशमुख फेसबुक पोस्ट : मावळते अधीक्षक डॉ. देशमुख (Superintendent of Police Dr Abhinav Deshmukh) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले. की शिवछत्रपतींची जन्मभूमी - शिवनेरी, स्वराज्याचे पहिले तोरण- तोरणा, शिवरायांची पहिली राजधानी- राजगड, मुरारबाजींचे शौर्य - पुरंदर, तानाजीचा पराक्रम - सिंहगड संभाजीराजांचे बलिदान वढू तुळापूर, ज्ञानोबा तुकोबा यांच्या शब्दांनी आणि ज्योतिबा सावित्रीच्या कार्याने पवित्र झालेल्या या भूमीत कर्तव्य बजावण्याचे संधी लाभली हे मोठे भाग्य आहे. आज नूतन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना कार्यभार सोपवला, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. माझे सर्व सहकारी, वरिष्ठ आणि पुणेकरांचे कोटी कोटी आभार, अशा शब्दात त्यांनी पुण्याचे महत्व आणि पुणेकरांचे आभार व्यक्त केले (Ankit Goyal taken charge) आहे.