VNI:-
पारडी येथे महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण...
विदर्भ न्यूज इंडिया
(चंद्रपूर/ ता. प्र. सावली : बंडू मेश्राम :-
भारतीय जनता सावली तर्फे कवठी प.स.अंतर्गत मौजा पारडी येथे जि. प. उच्च. प्राथ.शाळा येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ.छायाताई शेंडे माजी सभापती प.स.सावली यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.प्रकाश पा. गड्डमवार तसेच प्रमुख अथिती म्हणून श्री. अर्जुन भोयर,अरुण पा.पाल,सतीश बोमावर. विनोद धोटे.अंकुश भोपये, सरपंच बंडू मेश्राम. उपसरपंच पारस नागापूरे, छायाताई शेंडे, सारिका भोयर, राकेश मडावी, लोकनाथ रायपुरे, सुधीर पित्तलवार, छत्रपती पुडके, सुभाष शेंडे, अशोक नागपुरे, प्रमोद फाले, अमृत महोत्सव शारदा मंडळाचे सर्व महिला, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रमा प्रसंगी पारस नागापूरे यानि प्रास्ताविक केले, अर्जुन भोयर यांनी मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना समजाऊन सांगितल्या, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश पा गड्डमवार यांनी पंधरवडा सेवा सप्ताह मध्ये विविध उपक्रम कसे राबविले याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक शेंडे तर आभार प्रदर्शन राकेश मडावी यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.