धान खरेदी केंद्रात ८ कोटी ५६ लाखांचा अपहार उघड; संस्था अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

धान खरेदी केंद्रात ८ कोटी ५६ लाखांचा अपहार उघड; संस्था अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा

Vidarbha News India - VNI

धान खरेदी केंद्रात ८ कोटी ५६ लाखांचा अपहार उघड; संस्था अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा

विदर्भ न्यूज इंडिया

भंडारा (तुमसर) : धान खरेदी केंद्रात तब्बल ८ कोटी ५६ लाख ९४ हजार रुपयांचा अपहार तुमसर तालुक्यातील येरली येथे उघडकीस आला. या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुरुवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तुमसर येथील संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला तालुक्यातील येरली येथे धान खरेदी केंद्र मिळाले होते. खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये प्रत्यक्ष धान खरेदी न करता खरेदीचे खोटे दस्तऐवज तयार करून शासन, शेतकरी व पणन महासंघाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात संगनमत करून खरीप पणन हंगामात १ ऑक्टोबर २०१९ ते ३० जून २०२२ दरम्यान २८ हजार ६१२.४४ क्विंटल धान रक्कम ८ कोटी ३२ लाख ६२ हजार २०० रुपये आणि ७१ हजार ५३२ बारदाना नग - किंमत २४ लाख ३२ हजार ५७ रुपये असा ८ कोटी ५६ लाख ९४ हजार २५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद आहे.

  • संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नितीन शालिक भोंडेकर (२७) रा. रविदास वॉर्ड तुमसर, उपाध्यक्ष संदीप प्रकाश भोंडेकर (३९) रा. आझाद वॉर्ड तुमसर, संचालक शैलेश राजकुमार तांडेकर, सुनील बसुदास तुरकाने, अजय सदानंद कनोजे, विनोद कुमार प्रेमदास झाडे, अभय प्रकाश रोडगे अश्विन अजय भोंडेकर, रवी मोतीलाल नरसुरे, ग्रेडर अतुल प्रकाश चौबे सर्व रा. तुमसर अशी आरोपींची नावे आहेत.
  • त्यांच्यावर गुन्हा भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर तपास करीत आहेत.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->