कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक

Vidarbha News India - VNI

कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग (Woman Molestation) केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या (Gadchiroli Zilla Prishad) मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

पीडित महिलेची गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार
ओंकार रामचंद्र अंबपकर (रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली) असे आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे. १६ ते २० नोव्हेंबर यादरम्यान कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी म्हणजेच आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिकारी अरविंद कतलाम यांनी दिली आहे.

कोणता गुन्हा केल्यास कोणतं कलम?

भारतीय दंड संहितेत कलम ३४९ ते ३५८ हे विनयभंग गुन्ह्याशी संबंधित आहे. विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. अशांविरोधात स्त्रियांना दाद मागता यावी, यासाठी कायद्याची मदत घेतली जाते.

कलम ३५४ : एखाद्या स्त्रीला लाज वाटावी किंवा आक्षेपार्ह वाटावी अशा स्वरुपाची जबरदस्ती केल्यास कलम ३५४ अन्वये कारवाई केली जाऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यावेळी या गुन्ह्यात दोषी आढळल्यात शिक्षेत पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते.

कलम ३४९ - एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली गेली, तर कलम ३४९ नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

कलम ३५० - गुन्हा करण्याच्या हेतून एखाद्या व्यक्तीने महिलेच्या परवानगीशिवाय तिच्यावर जबरदस्ती केली तर कलम ३५० नुसार कारवाई केली जाऊ शकते.

कलम ३५१ - शब्दांसोबत शारीरिक हावभाव करत एखाद्या स्त्रिला लज्जा वाटावी, असं बोलणं किंवा कृती करणंही विनयभंग मानला जातो. त्यानुसार कलम ३५१ अन्वये कारवाई केली जाऊ शकते. वरील गुन्ह्यात ३ महिने कारावास आणि १०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

कलम ३५५ : एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतून हल्ला करणं किंवा धमकी देणं.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->