राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीसाठी अर्ज १५ दिवसांची मुदतवाढ - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीसाठी अर्ज १५ दिवसांची मुदतवाढ

Vidarbha News India - VNI

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीसाठी अर्ज १५ दिवसांची मुदतवाढ

विदर्भ न्यूज इंडिया 

राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती. पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे ११ लाख ८० लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. मात्र, संबंधित वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने इच्छुकांना अर्ज भरताना अनेक अडचणी जाणवत होत्या. राज्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बराच तास लागत होता. अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली असल्याची तक्रार करण्यात येत होती.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->