गडचिरोली पोलिस दलामार्फत घेण्यात आले शिबीर... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गडचिरोली पोलिस दलामार्फत घेण्यात आले शिबीर...

Vidarbha News India - VNI

गडचिरोली पोलिस दलामार्फत घेण्यात आले शिबीर...

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन "ऑपरेशन रोशनी" अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या "पोलिस दादालोरा खिडकी" च्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणुन दृष्टीदोष असलेल्या रुग्णांच्या जीवनातील अंधकार दुर करुन त्यांना नवी दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दल व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑपरेशन रोशनी" हा उपक्रम जिल्ह्रातील प्रत्येक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय स्तरावर एकुण 11 ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्याचे निश्चित केलेले आहे.

या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील धानोरा, कारवाफा, गडचिरोली (घोट), सिरोंचा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नेत्र तपासणी शिबीर पार पडले आहे. यामध्ये 840 हून अधीक नागरिकांनी सहभाग घेतला यापैकी 302 रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, असे निदर्शनास आले. यापैकी धानोरा येथिल दिनांक 04/11/2022 रोजी झालेल्या शिबिरातील एकुण 47 नागरीकांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक 11/11/2022 रोजी यशस्वीरित्या पार पडली. आज गडचिरोली पोलिस मुख्यालय येथे पोलिस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि ऑपरेशन रोशनी उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील इतर नागरिकांनी घ्यावा व यामध्ये उपविभाग कुरखेडा दि. 15/11/2022, पोस्टे कोरची दि. 17/11/2022, उपविभाग भामरागड दि. 18/11/2022, उपविभाग जिमलगट्टा 22/11/2022, उपविभाग हेडरी दि. 21/11/2022, उपविभाग एटापल्ली दि. 23/11/2022 व प्राणहिता (अहेरी) दि. 29/11/2022 पोलिस दलामार्फत अभियान रोशनीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला आहे, तसेच मोफत उपचार झाल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांनी गडचिरोली पोलिस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करुन गडचिरोली पोलिस दल व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आभार मानले. 

Share News

copylock

Post Top Advertisement

-->