वाघाच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची; खा.अशोकजी नेते यांनी घेतली भेट - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

वाघाच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची; खा.अशोकजी नेते यांनी घेतली भेट

Vidrabha News India - VNI 
वाघाच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची; खा.अशोकजी नेते यांनी घेतली भेट 
- चातगांव वनपरिक्षेत्रांतर्गत  वाघाची राजगाटा (चक) येथे वाघाची दहशत.
- वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या राजगाटा चक येथील इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट व आर्थिक मदत.
विदर्भ न्यूज इंडिया
धानोरा : चातगांव वनपरिक्षेत्रांतर्गत राजगाटा चक येथे स्व.सुधाकर उरकुडा भोयर वय ५१ वर्ष हे दिं.०३/११/२०२२ रोजी दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान शेतशिवारात बैल चराईसाठी गेले असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक  हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या संदर्भात माहिती दिली असता या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी  संबंधित दखल घेत मागील अनेक दिवसापासून या परिसरात वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक इसमाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे.
त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक पूर्णपणे भयभीत झालेली असल्याने या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता खा.अशोकजी नेते यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे  सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनां याप्रसंगी दिले.
तसेच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.
यावेळी खा.अशोकजी नेते यांनी  वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या
याप्रसंगी खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा,ओबिसी मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,वनपरिक्षेत्राधिकारी संजय पाडवे साहेब,क्षेत्र सहाय्यक तांबे जी,वनरक्षक दुर्गे,प्रमोद भोयर, बालाजी भोयर,ज्ञानेश्वर भोयर, मधुकर लेनगुरे,भास्कर लेनगुरे,गुणाजी ठाकरे,श्रीधर हुलके,व गावातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->