पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिन म्हणून उत्साहात साजरी
- जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे पं. जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालकदिन म्हणुन मोठ्या आंनदात व उत्साहात साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ ला स्वतंञ भारताचे पहीले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालकदिन म्हणुन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर होते, प्रमुख अतिथी श्री रमेश गेडाम सर होते, विशेष अतिथी श्री अशोक जुवारे सर, श्री जगदिश कळाम सर, श्री राजकुमार कुळसंगे सर, श्री चंद्रकांत वेटे सर, श्री कमलाकर कोंडावार सर आदी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक जुवारे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन श्री राजकुमार कुळसंगे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री जगदिश कळाम सर यांनी मानले. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी श्री भांडेकर सर, श्री गेडाम सर, श्री जुवारे सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी बालकदिनानिमित्य स्वतंञ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भाषणातुन शाळेतील विद्यार्थ्यांना माहीती दिली. आणि शेवटी शाळेतील मुलांना खाऊ वाटप करुन जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.