जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

Vidarbha News India - VNI
जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा                
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे भारतीय संविधान दिन मोठ्या आंनदात व उत्साहात साजरा                                                
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे आज २६ नोव्हेंबर २०२२ ला भारतीय संविधान दिन निमित्य शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर आधारित गीत सादर केले. तसेच शाळेतील शिक्षक वृंदानी व विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर आधारित माहीती व मार्गदर्शन आपल्या भाषनातुन केले. आजच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गणेश बोईनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन पदविधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहाय्यक शिक्षक रमेश गेडाम, अशोक जुवारे, राजकुमार कुळसंगे, जगदिश कळाम, चंद्रकांत वेटे, कमलाकर कोंडावार आदि मान्यवर उपस्थित होते.आजच्या संविधान दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजकुमार कुळसंगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन जगदिश कळाम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार अशोक जुवारे यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->