Gadchiroli : सात बळी घेतलेली वाघीन सापडता सापडेना; वनविभागासाठी ठरतेय डोकेदुखी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Gadchiroli : सात बळी घेतलेली वाघीन सापडता सापडेना; वनविभागासाठी ठरतेय डोकेदुखी

Vidarbha News India - VNI

Gadchiroli : सात बळी घेतलेली वाघीन सापडता सापडेना; वनविभागासाठी ठरतेय डोकेदुखी

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वनविभागात टी - ६ आणि गडचिरोली वनविभागात जी-५ अशी डब्बल नावे धारण करणारी वाघीण आता सातवा बळी घेऊन वनविभागासाठी डोकेदुखी ठरली आहे.

काही दिवसांपूर्वीच वनविभागाला नाकी नऊ आणणाऱ्या आणि चार जिल्ह्यांत संचार असलेल्या सीटी- १ या बिलंदर वाघाला जेरबंद करण्यात आले होते. या यशाचे कवित्व संपत नाही तोच ही वाघीण पुन्हा सक्रिय झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

खरेतर सीटी-१ वाघ ठिकठिकाणी धुमाकूळ घालत असतानाच टी-६ वाघीणही सक्रिय झाली होती. तिने गडचिरोली तालुक्यातील दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटोला, धुंडेशिवणी व चुरचुरा आदी भागांत संचार करताना सहा नागरिकांना ठार केले. त्यानंतर गुरुवारी (ता. ३) गडचिरोलीपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या राजगाटा चेक येथील सुधाकर भोयर या शेतकऱ्याला ठार करत तिने ही संख्या सातपर्यंत नेली आहे.

 सीटी-१ ला जेरबंद करायला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्पशुटर अजय मराठे यांची टीम आली असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथून डॉ. कुंदन पोरचलवार यांच्या नेतृत्वातील टीम या टी-६ उर्फ जी - ५ वाघीणीला पकडायला दाखल झाली होती. मात्र, ही वाघीण त्यांना जेरबंद करता आली नाही. याच दरम्यान सीटी-१ जेरबंद झाल्यानंतर त्या आनंदात या वाघीणीची चर्चा काहीशी मागे पडली.

पण, ही वाघीण पुन्हा सक्रिय झाल्याने अमरावतीची टीम दिवाळीच्या सुट्या आटोपून परत आली आहे. सध्या ही टीम अमिर्झा येथील क्षेत्र सहायक कार्यालयात तळ ठोकून या वाघिणीला जेरबंद करण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहे. वाघांना नावे देण्याची वनविभागाची वेगळी पद्धत आहे. सीटी १ हा वाघ सर्वांत प्रथम चिमूर परिसरात दिसला होता. त्यामुळे त्याला चिमूर टायगर १ असे नाव देऊन त्याचेच संक्षिप्त रूपांतर सीटी-१ असे करण्यात आले होते.

 टी-६ या वाघिणीचा संचार वडसा वनविभागातील पोर्ला वनपरीक्षेत्रासोबतच गडचिरोली वनविभागातील चातगाव वनपरीक्षेत्रातही आहे. हे दोन्ही विभाग आपल्या क्षेत्रात आढळणाऱ्या वाघांना आपल्या पद्धतीने नाव देतात. त्यामुळे वडसा वनविभागात टी-६ नावाने ओळखली जाणारी ही वाघीण गडचिरोली वनविभागात जी - ५ नावाने नोंदली गेली आहे. असे असले, तरी ती टी-६ या नावानेच अधिक ओळखली जाते.

दणकट शरीरयष्टी...

वाघ या प्राण्यामध्ये दोघेही दिसायला जवळपास सारखेच असले, तरी निसर्ग अभ्यासक त्यांच्यातील फरक सहज ओळखू शकतात. वाघाचा चेहरा मोठा, काहीसा चौकोनी, गोलसर आणि हनुवटीला, चेहऱ्याच्या बाजूला बऱ्यापैकी केस असलेला असतो, तर वाघिणीचा चेहरा हनुवटीकडे काहीसा निमुळता असतो.

शिवाय वाघीण वाघापेक्षा आकाराने लहान असते. पण, टी-६ ही वाघीण चांगली दणकट आहे. तिची एकूण शरीरयष्टी बघता नर वाघाचाच भास होतो. वाघ आणि वाघिणीची ओळख त्यांच्या पावलांच्या ठशांवरूनसुद्धा करता येते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->