राज्यातील 7135 ग्रामपंचायतींसाठी 74 टक्के मतदान, उद्या मतमोजणी; थेट सरपंचही ठरणार - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राज्यातील 7135 ग्रामपंचायतींसाठी 74 टक्के मतदान, उद्या मतमोजणी; थेट सरपंचही ठरणार

दि. १९ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

राज्यातील 7135 ग्रामपंचायतींसाठी 74 टक्के मतदान, उद्या मतमोजणी; थेट सरपंचही ठरणार

विदर्भ न्यूज इंडिया

मुबंई : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी 74 टक्के इतके मतदान झाले. सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान पार पडले. किरकोळ अनुचित प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून मंगळवारी (20 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान घेण्यात आले. या मतदानाला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला.

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 67 टक्के मतदान झाले होते. हा आकडा वाढून सायंकाळी 5.30 पर्यंत सरासरी 74 टक्क्यांपर्यंत पोहचला.

राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर काही ठिकाणी सदस्यपद आणि सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 7 हजार 135 ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पडली.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या भागात मतदानासाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंतची वेळ होती. मतदानाच्या व्यवस्थेसाठी दोन दिवस आधीच संबंधित गावांत हेलिकॉप्टरने पथके पाठवण्यात आली होती. ही पथके सायंकाळी माघारी परतली. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कोणत्या जिल्ह्यात, किती ग्रामपंचायतींसाठी मतदानः

ठाणे - 35, पालघर -62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, नगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, संभाजीनगर - 208, बीड - 671, नांदेड - 160, धाराशीव- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7135.

भंडाऱ्यातील कुंभली या गावात मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटांत हाणामारीची घटना घडली. तर करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. बीडमधील मेंगडेवाडी येथे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. पाटोदा गावात बोगस मतदानाचा प्रकारही उघड झाला. सांगलीतील नरवाड येथे मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साडय़ा आणि पाचशे रुपयाच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->