विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शिक्षक संघाचे प्रेरणास्थान माजी आमदार आदरणीय स्व.शिवाजीराव पाटील (अण्णा) यांचा तृतिय स्मृतिदिन जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे श्रद्धास्थान मा.आमदार स्व.शिवाजीराव पाटील(अण्णा) यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी जिल्हाभरात बुधवारी तृतिय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील विवीध तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाभरात ठिकठिकाणी विवीध मान्यवरांनी शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मा.आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील(अण्णा) यांनी आपले संपुर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदल व शिक्षकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वेचले. शिक्षण क्षेत्रासाठी व शिक्षकांचे जिवनमान उंचाविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. येणा-या दिवसांत अण्णाचे प्राथमिक शिक्षकांसाठीचे कार्य पुढे चालु ठेवण्याचे काम जोमाने करण्यासाठी तालुक्यापासुन जिल्ह्रापर्यंतच्या प्रत्येक पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रत्येक शिलेदारांनी कामाला लागावे. शिवाजीराव पाटील यांच्या संघटनात्मक विचारांचा व कार्याचा वारसा पुढे चालु ठेवणार,अशा भावना यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केल्या.
चामोर्शी : येथे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जिल्हा सहसरचिटणीस सुरेश पालवे,तथा संघाचे मार्गदर्शक तथा जिल्हा संघटक हेमंत चावरे,तालुकाध्यक्ष किशोर कोहळे,सरचिटणीस मारोती वनकर,तालुका सल्लागार शंकरराव सुरजागडे,तालुका कोषाध्यक्ष प्रशांत पोयाम,तालुका कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते,तालुका प्रसिद्धीप्रमुख रुषीदेव कुनघाडकर,युवा आघाडी अध्यक्ष सुजित दास,बंडु चिळंगे,अशोक जुवारे,किशोर पवार,जगदिश कळाम,दिगांबरदादा देवकते,आनंद देवकते,पतसंस्थेचे कर्मचारी श्री धोडरे आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली/धानोरा : येथे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री.आशिष धाञक,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वासलवार,जिल्हासल्लागार निलकंठ निकुरे,तालुकाध्यक्ष धनेश कुकडे,तालुकाध्यक्ष राजु मुंडले,तालूका कार्याध्यक्ष संजय मडावी, जगदिश मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
वडसा/कुरखेडा : येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जेष्ठ नेते तथा मार्गदर्शक गजानन शेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दहीकर,जिल्हाउपाध्यक्ष अंबादास बागडे,तालुकाध्यक्ष शञृघ्न झुरे,तालुका सरचिटणीस गंगाधर ठाकरे,कार्याध्यक्ष गिरीधर बावनथडे,तालुका कोषाध्यक्ष देवचंद म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होते.