संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावा ; योगिताताई मधुकर भांडेकर - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावा ; योगिताताई मधुकर भांडेकर

Vidarbha News India - VNI
संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावा ; योगिताताई मधुकर भांडेकर 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांचे प्रतिपादन

विदर्भ न्यूज इंडिया
(गडचिरोली ) चामोर्शी : वालसरा येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात विवीध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 
संत शिरोमणी जगनाडे महाराज हे तेली समाजातील एक मोठे समाज सुधारक व समाजासाठी  कार्य करणारे महान संत होऊन गेले त्यांच्या कार्य विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची समाजाला आज गरज असून त्यांचे कार्य सर्व तेली समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. संताच्या कार्या व विचारांमुळे आपणाला जीवनात समोर जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो आपल्याला मिळालेले ज्ञान व साहित्य वाचनातून आपला आत्मविश्वास वाढतो व आपण कोणतेही काम आत्मविश्वासाने पुर्णत्वास नेऊ शकतो. आपला समाज मोठ्या प्रमाणात आहे मात्र समाजामध्ये आजही अज्ञान व अल्पशिक्षण असल्याने आपला समाज मागासलेला आहे. या बाबीची दखल घेऊन समाजातील बांधवांनी, तरुण पिढीतील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान होऊन आपला विकास करावा व समाजाच्या विकासासाठी परिश्रम घ्यावे. आपल्या तेली समाजात अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत मात्र त्यांची आपल्याला माहिती नसल्याने आपण अज्ञानी बनून जगत आहोत. आपल्या तेली समाजातही अनेक संत महात्मे झाली याचा आपल्याला अभिमान असायला हवा व संतांचे कार्य व विचारांनी प्रेरणा घेऊन युवकांनी समोरील वाटचाल करावी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांनी केले.
वालसरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
जय संताजी स्नेही मंडळ, वालसराच्या वतीने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी श्री घनश्याम लाकडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील श्री भगिरथजी भांडेकर,युवा नेते मधुकर केशवराव भांडेकर,तं.मु.अध्यक्ष श्री लक्ष्मणराव वासेकर,वालसरा ग्रा.प.च्या माजी सरपंच वनिता वासेकर,श्री रविंद्रजी ठाकरे,श्री मनोहरजी दुधबावरे,श्री उड्डान सर, ग्रा.पं. सदस्या शालीनी शेट्टे, श्री नंदाजी बुरांडे,श्री देवदास गव्हारे,श्री आनंदराव कोहळे,श्री मारोती भांडेकर,श्री काशिनाथ कोठारे,शिलाताई शामराव भांडेकर,लताताई गुरुदास बुरांडे,श्री रघुनाथ भांडेकर,श्री गुरुदास सोमनकर श्री किशोर कोहळे,श्री गजानन सातपुते,श्री साईनाथ सुखदेव भांडेकर,श्री विनायक बारसागडे,श्री राजु शेट्टे,श्री संदिप सातपुते,श्री निलेश कोठारे,श्री साईनाथ रुषीजी भांडेकर,श्री मारोती दुधबळे,श्री रामचंद्र भांडेकर तसेच वालसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत वालसरा,राजनगट्टा,कुंभारवाही,भिवापुर येथील समस्त तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला  हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर वालसरा ग्रामपंचायत अंतर्गत राजनगट्टा व कुंभारवाही येथील तेली समाजातील यावर्षी नव्याने शासकीय नौकरीवर लागलेल्या कर्मचा-यांचा शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्पगूच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कारमुर्ती मध्ये प्रामूख्याने उमेश शामराव भांडेकर,मयुर शामराव भांडेकर,योगेश नंदाजी बुरांडे,कु.दिपाली गुरुदास बुरांडे यांचा समावेश होता. तसेच जयंतीचे औचित्य साधून राञीला गावातील मुलां-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक-१००१/- चे बक्षिस जय संताची स्नेही मंडळ वालसरा,द्वितीय क्रमांक-७०१/- चे बक्षिस जि.प.गडचिरोलीच्या माजी अध्यक्ष सौ.योगिताताई मधुकर भांडेकर,तृतिय क्रमांक-५०१/- चे बक्षिस महाराष्टृ प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,आणि प्रोत्साहनपर चौथे क्रमांक-५०१/- चे बक्षिस श्री लक्ष्मण मसाजी भांडेकर व श्री नरेश लालाजी शेट्टे यांनी संयुक्तपणे दिले.सांस्कतिक कार्यक्रमाचे परिक्षक म्हणुन श्री गुरुदासजी सोमनकर सर यांनी काम पाहीले.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणुन घनश्यामजी लाकडे,रविंद्रजी ठाकरे,मनोहरजी दुधबावरे, श्री भगिरथजी भांडेकर,मधुकरजी भांडेकर,श्री उड्डान सर यासह अनेक मान्यवरांनी श्री संत जगनाडे महाराज व त्या काळात होऊन गेलेल्या समाजातील संत महात्मांच्या जीवन कार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला.
यावेळी वालसरा,राजनगट्टा,कुंभारवाही व भिवापुर येथील तेली समाज बांधव व नागरिक,महिला व युवक-युवती,विद्यार्थी तसेच जय संताजी स्नेही मंडळ वालसराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री साईनाथ भांडेकर यांनी केले आभार भांडेकर यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->