शेतशिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि..! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

शेतशिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि..!

दि. १५ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

शेतशिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि..!

विदर्भ न्यूज इंडिया

(चंद्रपूर) सावली : शेतशिवारात गेलेल्या इसमाला वाघाने हल्ला करून ८०० मीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना (दि.१४) बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील चकपिरंजी बीट क्रमांक ३९७ मधील रुद्रापूर येथे घडली.

बाबुराव बुधाजी कांबळे (६०) असे मृताचे नाव असून तो रुद्रापूर येथील रहिवासी होता. एकाच आठवड्यात वाघाने दोघांचा बळी घेतल्याने सावली तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत.

मृत बाबुराव कांबळे हा रूद्रापूर परिसरात गेला होता. पाठीमागील शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार केले. घटनास्थळापासून जवळपास ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. त्यामुळे वाघाने मृतदेह सोडून पळ काढला. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पाठवला. वनविभागाकडून मृताच्या कुटुंबास २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->