गडचिरोलीतील दामरंचा जंगलात चकमक, दोन नक्षलवादी ठार - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गडचिरोलीतील दामरंचा जंगलात चकमक, दोन नक्षलवादी ठार

दि. २३ डिसेंबर २०२२
Vidarbha News India - VNI

गडचिरोलीतील दामरंचा जंगलात चकमक, दोन नक्षलवादी ठार

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंच्या दामरंचा जंगल परिसरात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बिजापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. अहेरी तालुक्यातील दामरचा जंगल क्षेत्रातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि बिजापूर पोलीस संयुक्त अभियान राबवत होते. दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून मृतांमध्ये एका महिला नक्षलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळावर शोध कारवाई सुरू असून आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केला आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->